आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार:मराठा महासंघाच्या प्रसाद कोंडे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार

सातारा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. बचावासाठी कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकाने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे खंडाळा, शिरवळसह पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारात काेणीही जखमी झाले नाही. गोळीबारानंतर आरोपी पळून गेले. प्रसाद प्रदीप कोंडे - देशमुख (रा.धनकवडी, पुणे ) हे वीर धरण लोणंद येथील शंकराचे मंदीर दर्शन घेऊन लोणंद येथे प्लाॅट पाहण्यासाठी चालले असताना निर्जन रस्त्यावर हा प्रकार घडला. हा प्रकार हा आर्थिक व व्यावसायिक कारणांवरून घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...