आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघटस्थापनेच्या मुहूर्ताने राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली होत आहेत. कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराचे दरवाजेही याच दिवशी भाविकांसाठी खुले होत आहेत. गतवर्षीच्या नवरात्रोत्सवात ऑनलाइन दर्शनावर समाधान मानलेल्या देवीच्या लाखो भक्तांना आता घटस्थापनेच्या दिवसाची प्रतीक्षा आहे. मंदिर प्रशासन मात्र यामुळे सतर्क झाले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा विचार करता सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, मंदिराची रंगरंगोटी, स्वच्छता यासह इतर कामाला आता वेग आला आहे.
कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. अशातच नेमके नवरात्रोत्सवात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान मंदिर व्यवस्थापनापुढे आहे. तरीही अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे. मास्क सक्ती, सॅनिटायझरचा वापर हे सगळे असले तरी भक्तांना विनासायास सुटसुटीत दर्शन कसे देता येईल यावर अभ्यास केला जात असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.
थर्मल स्कॅनिंगसह सीसीटीव्ही यंत्रणाही सज्ज
देशातील अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून योग्य उपाययोजना केली जाणार आहे. प्राथमिक तयारी म्हणून थर्मल स्कॅनिंग, सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज झाली आहे. मंदिर स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.