आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने उड्डणपुलावरून दुचाकी कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.
सुनील गंगाराम गावडे (34) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कोल्हापूरचा रहिवासी असणारा हा तरूण चंदनगडहून दुचाकीवरून पुण्याला जात असताना हा अपघात झाला.
नक्की काय झाले?
सुनील गावडे हा पुण्यात नोकरी करत होता. काही दिवसांकरता तो चंदनगड या त्याच्या गावी आला होता. रायगाव फाट्यावर आल्यानंतर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. उड्डाणपुलावरून तो दुचाकीसह खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी अपघाताची नोंद झाली.
तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
दरम्यान, सातारा शहरातील दुसऱ्या घटनेत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा चिहिरीत बुडून मृत्यू झालाय. गोडोली येथे ही घटना घडली.सुजल अजय सणस (वय 26) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, सुजल याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. रविवारी दुपारी तो मित्रांसमवेत विहिरीमुळे पोहायला गेला होता.विहिरीत पोहत असताना तो गटांगळया खाऊ लागला. हा प्रकार मित्रांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत तो बुडाला होता.
या प्रकारानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुजलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या दोन्ही घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.