आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायलयाने जोरदार झटका दिला आहे. दगडफेक प्रकरणी राज ठाकरे यांनी सादर केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिराळा तालुक्यात आंदोलन केले होते. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन कोर्टात खटला सुरू आहे.
नेमके प्रकरण काय ?
राज ठाकरे यांना 22 ऑक्टोबर 2008 रोजी अटक झाली होती. या अटकेचे राज्यभर पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात दगडफेक, तोडफोड केली होती. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथेही 'मनसे'च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आक्रमक होत दगडफेक केली. काही वाहनांना लक्ष्य केले. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध कोकरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिराळा न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आता जामिनासाठी प्रयत्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनात राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. त्यामुळे त्यांना या खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती राज ठाकरे यांच्या वकिलाने इस्लापूरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली आली होती. मात्र, या विनंतीला सरकारी वकील राजेश पाटील यांनी तीव्र हरकत घेतली. अजून साक्षीदारांचे जबाब नोंदवले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांना दोषमुक्त करू नका, अशी न्यायालयाला विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने दोषमुक्तीची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे राज ठाकरे यांना जोरदार धक्का बसला आहे. आता त्यांना जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
परळीत मिळाला दिलासा
राज ठाकरे यांना 2008 मधील तोडफोड प्रकरणी परळीच्या कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, त्यांनी 18 जानेवारी रोजी परळीच्या कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर न्यायालयाने 500 रुपयांचा दंड ठोठावत अटक वॉरंट रद्द केले. राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुनावणीकडे पाठ फिरवले होते. यापूर्वीही त्यांना दोन वेळेस अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. आता राज यांना इस्लापूर न्यायालायतही जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ होणार आहे.
संबंधित वृत्त:
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.