आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दापोलीतील सभेत राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद:म्हणाले - महाराष्ट्रातील सत्ता हातात द्या, मग महाराष्ट्र कसा करतो पहा

रत्नागिरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सत्ता माझ्या हातात द्या, मग तुम्ही बघाच महाराष्ट्र कसा करतो, असे वक्तव्य मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, कोकणात खट्ट जरी झालं, तरी मला त्याचा धडाम असा आवाज मुंबईत येईल, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. कोकणातले प्रश्न अद्याप जैसे थेच आहेत. स्वतःहून पुढे या, असे खुले आवाहन राज ठाकरे आयोजित सभेत केले आहे.

ठाकरेंनी दिले संकेत

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली. राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत कोकणात येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल कशी असेल, याचे स्पष्ट संकेत दिले. कोकणामध्ये अनेक पदाधिकारी काम करतात. पण काही लोक त्यांना काम करू देत नाही असे देखील दिसून आलं आहे.

बरं झालं कोकण दौरा केला...

आगामी काळामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे बदल करतो की, कोणी काहीच बोलणार नाही. असे राज ठाकरे म्हणाले, एकंदरीत हे खूप चांगले झाले की, मी कोकण दौऱ्यावर आलो त्यामुळे इथल्या काही गोष्टी मला समजल्या. मुंबईत एका पक्षाचं काम करायचं, गावी आल्यावर वेगळ्या पक्षाचं काम करायचं, ही भानगडच आता ठेवणार नाही मी, असं देखील ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...