आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:राज ठाकरे हे पडद्याआडून भाऊबंदकी न करता भाजपची सुपारी घेऊन राजकारण खेळत आहेत - गोऱ्हे

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे नेते राज ठाकरे हे पडद्याआडून भाऊबंदकी न करता भाजपची सुपारी घेऊन राजकारण खेळत आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत केला.

जनतेच्या मनात स्थान मिळवण्यासाठी भूमिका बदलूनही राज ठाकरे वारंवार अपयशी ठरत आहेत. सध्या भाजपला अनुकूल भूमिका त्यांनी घेतली आहे. कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखी वर्तणूक ठेवून आंदोलन करणे योग्य नाही. भाजपची तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणी ही राज ठाकरेंचा ‘गेम’ करण्यासाठीच आखली जात आहे, असेही त्या म्हणाल्या. मुंबई व शिवसेनेचे अतुट नाते विरोधकांनी किती तोडायचा प्रयत्न केला, तरीही ते तुटणार नाही, असा विश्वास गोऱ्हेंनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...