आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरेंचे समर्थन ही अफवा:त्यांच्या विकृत, अनैतिहासिक मांडणीवर टीका केली- राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा खुलासा

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची कोल्हापुरात भेट घेतली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले. त्यावर आता खुद्द जयसिंगराव पवार यांनीच भेटीबाबत पत्रातून खुलासा केला आहे. बाबासाहेब पुरंदरेंबाबत चर्चाच झाली नाही, मी त्यांच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली. अशी स्पष्टोक्ती त्यांनी आज दिली.

काय म्हणाले जयसिंगराव पवार?

जयसिंगराव पवार पुढे म्हणाले, “राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी मला बाबासाहेब पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मी इतिहासकार म्हणून पुरंदरेंचे गौरवीकरण करणारे वक्तव्य केलेले नाही. कारण मी आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे.’

राज ठाकरेंची होती इच्छा

जयसिंगराव पवार म्हणाले, “राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्याशी इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली.

पुरंदरेंबाबत चर्चाच नाही

जयसिंगराव पवार म्हणाले की, मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल आणि त्याचे मी स्वागत करेन, असे मी राज यांना म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काहीही चर्चा झाली नाही, अशी माहिती जयसिंगराव पवार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...