आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी बैठक:राजेभोसलेंची उचलबांगडी, सुशांत शेलार चित्रपट महामंडळाचे नवे अध्यक्ष

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अभिनेते सुशांत शेलार यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. यावेळी मागील बैठकीतील इतिवृत्त नामंजूर करून मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि १४ माजी संचालकांचे सभासदत्व कायम ठेवण्याचा निर्णय झाला.

गेल्या तीन वर्षांपासून चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यातच कार्यकारिणीची मुदत संपून वर्ष झाले तरी त्यांनी बैठक ठेवली नाही. महामंडळाचे कामकाज जवळपास ठप्प होते. अखेर कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यवाह सुशांत शेलार यांना आपल्या अधिकारात बैठक लावावी अशी विनंती केली होती. संचालक व सभासदांच्या मागणीनंतर बुधवारी हॉटेल केट्रीमध्ये ही बैठक पार पडली. त्यानंतर उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी नव्या अध्यक्ष निवडीची माहिती नंतर जाहीरपणे पत्रकार परिषदेत दिली.

बैठकीला अभिनेता विजय पाटकर, इम्तियाज बारगीर, मिलिंद अष्टेकर, प्रिया बेर्डे, अरुण चोपदार, अमर मोरे, सतेज स्वामी, बाळासाहेब बारामती, सदाशिव पाटील, नीलेश जाधव, सुनील मुसळे, विजय ढेरे उपस्थित होते. तर मेघराज भोसले, वर्षा उसगावकर, संजय दुबे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर अनुपस्थित होते.