आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपण 'एकला चलो रे'च्या भूमिकेवर ठाम आहोत. चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेली भेट केवळ मित्रत्वाच्या पातळीवर होती, अशी माहिती सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजू शेट्टी यांच्या भेटीनंतर नाना चर्चांना उधाण आले. त्यात चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी सोबत येतील असा विश्वास व्यक्त केला होता. या साऱ्यावर राजू शेट्टी यांनी आज भूमिका स्पष्ट केली.
अशी चर्चा सुरू
राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या की, चर्चांना उधाण येते. या भेटीत नेमके काय झाले असेल, याच्या बातम्या होतात. आता भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मध्यंतरी काही काळ एकत्र घालवला. मात्र, तदनंतर दोघांमध्ये काडीमोड झाला. त्यात आता मंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट झाली. त्यामुळे हे दोन्ही पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा सुरू झाली होती.
पाटलांनी दाखवला विश्वास
चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य करून भर घातली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या 'रासप' भाजपसोबत आहे. 'स्वाभिमानी'ही होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात ते दूर झाले. मात्र, राजू शेट्टी यांच्याशी आमचा संवाद असतोच. ते सोबत येतील, याचा विश्वास आहे, असे वक्तव्य केली. यामुळे राजू शेट्टी पुन्हा भाजपशी युती करणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
राजकीय चर्चा नाही
राजू शेट्टी यांनी या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, आम्ही भाजप किंवा महाविकास आघाडी कोणासोबतही जाणार नाही. आमची एकला चलो रे ची भूमिका कायम आहे. भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कसलिही चर्चा झालेली नाही. नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळेसच चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळेसही पाटील यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
'ते' तेव्हाच ठरवणार
संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळेस मी शाहूवाडी दौऱ्यावर होतो. त्यांच्याशीही गेल्या दीड महिन्यापासून कसलेही बोलणे झालेले नाही. हातकणंगले मतदार संघात सहयोगी उमेदवार द्यायचा की, शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा घ्यायचा याचा निर्णय त्यावेळची परिस्थिती पाहून घेण्यार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.