आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या काही महिन्यात तिसऱ्यांदा अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची अवस्था ही आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झाली असून एकनाथ शिंदेंच्या काळात शेतकरी अनाथ झाले आहे, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कांदा, द्राक्ष, भोपळा, भाजीपाला, पेरु यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आपले पीकतळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो, पण निसर्गाच्या फटक्याने सर्व काही होत्याचे नव्हते होते. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना कर्तव्य श्रेष्ठ असावे
माजी खासदार राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचे असेल, तर खुशाल घ्या, ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते, त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे. शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. प्रभु रामचंद्रानी त्यांच्या प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. म्हणूनच रामराज्य, असा उल्लेख आपण करतो असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. जर तसे करायचे असेल तर शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
म्हणून दौऱ्याला गेलो नाही
मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात कृषीमंत्री सत्तार हे गैरहजर दिसले. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, खुद्द अब्दुल सत्तार यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'मी राम भक्तच आहे. पण शेतकऱ्यांवर संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसाणीची पाहणी करण्यासाठी मी दौरा काढला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे देखील रामाचेच काम आहे. त्यामुळे मी अयोध्येला गेलो नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.