आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदखद पडली बाहेर:राजू शेट्टींनी ठोकला महाविकास आघाडीला 'रामराम', सरकारमधून बाहेर, शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धोरणात्मक निर्णय घेताना महाविकास आघाडी सरकार बेदखल करीत असल्याची राजू शेट्टींची खदखद अखेर बाहेर आली. राजू शेट्टी यांचा स्वामीमानी पक्ष महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडला. याबाबतची जाहीर घोषणा शेट्टी यांनी आज कोल्हापूर येथे केली.

धोरणात्मक निर्णय घेताना महाविकास आघाडी सरकार बेदखल करीत असेल तर त्यावर विचार करावा लागेल असे सुचक विधान स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केले होते. हा निर्णय त्यांनी पाच एप्रिलला जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज त्यांनी कोल्हापुरात घोषणा केली. महाविकास आघाडी आणि आमचे सर्व संबंध संपले असे राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीर केले.

काय म्हणाले राजू शेट्टी?

''मी आज तुमच्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो. महाविकास आघाडी आणि आमचे संबंध सगळे संपले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ. त्यांना सर्व परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवले. मुंबईवाल्यांनी फसवले. आम्हाला आता आमच्या मनगटावरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाच्या विरोधात निराश होऊन तडफडून मरण्यापेक्षा लढता लढता मरण्याचा निर्णय घेऊया. असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी केले आहे.

ही होती शेट्टींची खदखद

राज्य सरकार आपल्याशी संवाद साधत नाही. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर सरकार सत्तेत आले त्या किमान समान कार्यक्रमाचे काय झाले? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला होता. अनेक मुद्दे खटकणारे आहेत. अनेक मुद्द्यांबाबत फक्त किमान समान कार्यक्रम म्हटले गेले. एखादे नवीन धोरण राबवताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद साधला नाही. अशी खदखद व्यक्त करीत त्यांनी सरकारला अडीच वर्ष होत आली आता सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली असे वक्तव्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...