आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे एक्स्पायरी डेट संपलेले नेते, बळीराजा शेतकरी संघटनेची खरमरीत टीका

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी राज्यात ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी चळवळ उभी करणारे राष्ट्रीय नेते माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सदाभाऊ खोत हे आता एक्स्पायरी डेट संपलेले नेते झाले आहेत. शेट्टी यांनी नुकताच आमच्याबरोबर एकरकमी ऊसदराचा लढा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात लढू शकत नाहीत. खोत यांनी राजकीय पक्षाचा बिल्ला लावल्याने त्यांची अवस्था पाळीव प्राण्यासारखी झाली आहे, अशी खरमरीत टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

पंजाबराव पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि शेतकरी चळवळीला ताकद देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे ७ नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातून संघर्ष यात्रेला सुरुवात करणार आहोत. शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे, दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व कराड असा यात्रेचा मार्ग असून कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल. त्यानंतर ही संघर्ष यात्रा राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी आल्यानंतर येथे एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये दरासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. मागण्या मान्य होईपर्यंत खर्डा-भाकर खाऊन ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल.’

बातम्या आणखी आहेत...