आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलन:शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी 5 तारखेला देशात रास्ता रोको, ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची घोषणा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागणी डावलल्यास साखरेचा एक कणही गोडाऊनबाहेर पडू देणार नाही असा इशारा

संघटनेच्या मागणीला डावलून साखर कारखाने पुढे जाणार असतील तर गोडाऊनमधून साखरेचा एक कण बाहेर पडू देणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ५ नोव्हेंबर रोजी देशभरात रास्ता रोको आंदोलन यशस्वी करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज झालेल्या ऑनलाइन ऊस परिषदेत केली.

मागणी डावलल्यास साखरेचा एक कणही गोडाऊनबाहेर पडू देणार नाही असा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित १९ वी ऊस परिषद यंदा कोरोनामुळे ऑनलाइन घेण्यात आली. परिषदेत महत्त्वाचे नऊ ठराव मांडण्यात आले.

> ज्या साखर कारखान्यांनी अद्याप २०१९-२० सालची एफआरपी दिलेली नाही, त्या साखर कारखान्यांच्या संचालकांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे.

> राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने केवळ हेक्टरी १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. ही नुकसान भरपाई सरसकट प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये करण्यात यावी.

> शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरित रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा १२ तास वीज देण्यात यावी.

> लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले विनाअट माफ करण्यात यावी. तसेच वाढीव वीजदर कमी करण्यात यावे.

> केंद्र सरकारने खासगी उद्योगांना चालना देण्यासाठी शेतीची बाजारपेठ खुली केली असल्याचे जाहीर करून तीन नवीन कृषी कायदे अस्तित्वात आणले. मात्र या कंपन्यांना शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करताना एमएसपीच्या हमीभावाने खरेदी करण्याचे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आणलेला हा कायदा शेतकऱ्यांना खाईत घालणारा आहे. हा कायदा त्वरित रद्दबातल करून एमएसपी कायदेशीररीत्या बंधनकारक करून नव्याने कायदा अस्तित्वात आणावा.