आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष आघाडीतून बाहेर, कोल्हापूरच्या मेळाव्यात शेट्टी यांनी केली घोषणा

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनडीएमधून बाहेर पडून राज्यातील महाविकास आघाडीचा हात धरणाऱ्या स्वाभिमानी पक्षाने आता सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी कोल्हापूरच्या हातकणंगले येथे पार पडली. या वेळी त्यांनी हा निर्णय घेतला.

केंद्र व राज्य सरकारचे शेतीविषयक धोरणातील फायदे व तोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील आंदोलनाची पुढील दिशा, स्वाभिमानी पक्षाची राजकीय भूमिका यासह विविध विषयांवर दोन सत्रांच्या चर्चासत्राच्या शेवटी शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची मते ऐकली. महाविकास आघाडी सोडल्यावर आपण काय करायचे यावर आमची चर्चा झाली. शेट्टी स्वतंत्र राहतात की पुन्ही एनडीएमध्ये सामील होतात, हे लवकरच कळेल.

बातम्या आणखी आहेत...