आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:महिलेला लिफ्ट देऊन बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरी निघालेल्या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडितेने अक्षय ऊर्फ अजिंक्य सुनील कांबळे (रा. कसबे डिग्रज) याच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पीडितेची आणि संशयिताची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. २१ ऑक्टोबर रोजी पीडिता एका ठिकाणी खरेदीसाठी गेली होती. तिथून घरी परतण्यासाठी ती एका ठिकाणी थांबली होती. या वेळी संशयित कांबळे तिथे आला व त्याने घरी सोडतो म्हणत पीडितेला दुचाकीवर बसवून एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच जिवे मारण्याचीही धमकी पीडितेला दिली होती.

बातम्या आणखी आहेत...