आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ आला होता पण..:कोल्हापूरचे दाम्पत्य गाडीसह कोसळले 100 फूट खोल दरीत, देवरुख पोलिसांच्या मदतीने तिघांचा वाचला जीव

रत्नागिरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूरचे दाम्पत्य कारसहित 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने तिघांनाही वाचवण्यात यश आले आहे. रत्नागिरीतील देवरुख येथे समोरील रस्ता न दिसल्याने ही दूर्घटना घडली.

नक्की काय झाले?

कोल्हापूरचे विनायक मढवळ (वय 33), पत्नी सिद्धी मढवळ (वय 32) आणि त्यांची मुलगी मीरा (वय 4) हे कारने रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून कोल्हापूरला येत असताना 8 एप्रील रोजी रात्री हा अपघात झाला. साखरप्यापासून पुढे 2 किमी अंतरावर मुरडे घाटात समोरून आलेल्या वाहनाचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोर रस्ता दिसला नाही. त्यामुळे काही सेकंदातच गाडीसह तिघेही 100 फूट खोल दरीत कोसळले.

पोलिसांना मागितली मदत

कार कोसळली तेंव्हा मध्यरात्रीचे दोन वाजले होते. विनायक यांच्या पत्नी सिध्दी यांनी नातेवाईकांना आणि देवरूख पोलिसांना संपर्क करत अपघात झाला असून तात्काळ मदत हवी असल्याचे सांगितले. त्यावेळी देवरुख पोलिस सहकाऱ्यांसह 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले व तिघांनाही दोरीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

तिघेही सुखरूप बाहेर

राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोरीच्या मदतीने दरीत उतरून प्रथम गाडीची डिकीतून मुलगी मीराला बाहेर काढले. त्यानंतर विनायक आणि सिद्धी यांना बाहेर काढून सुखरूप दरीतून बाहेर काढले. मध्यरात्री कोणीही मदतीला नसताना देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ दाम्पत्याला अश्रु अनावर झाले.