आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माने प्रचंड ट्रोल:बंडखोर खासदार धैर्यशील माने शिवसैनिकांकडून ट्रोल

कोल्हापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर सामान्य जनतेसह शिवसैनिक नाराज असल्याचे उदाहरण पुढे आले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निर्णयाबाबत खा. माने यांनी ट्वीट केल्यानंतर माने प्रचंड ट्रोल झाले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची बंडखोरी अजूनही शिवसैनिकांना रुचलेली नाही. आता या यादीमध्ये धैर्यशील माने यांचीही भर पडली आहे. काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर विमानतळासंदर्भात बैठकीनंतर माने यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत माहिती दिली. मात्र, त्या पोस्टवरून कौतुकाऐवजी ते सडकून ट्रोल झाले.

कमेंट सेक्शन करावे लागले बंद माने यांना ट्रोल करत शिवसैनिकांनी गद्दार, आता माजी खासदार, परत येणार नाही, अतिशय लहान वयात राजकीय आत्महत्या केली, सर्व कमेंट्स वाचा आणि आताच राजकीय संन्यास घेण्याची मानसिकता करून ठेवा, अशा शब्दांमध्ये त्यांना ट्रोल करण्यात आले. त्यामुळे खा. माने यांना कमेंट सेक्शनच बंद करावे लागले.

बातम्या आणखी आहेत...