आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाइकांची विनंती:मृतदेहांचे अवयव हाती लागत असल्याने तळियेत मदतकार्य थांबले, 53 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात मिळाले यश

रायगड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाड तालुक्यातील तळिये गावात २२ जुलै रोजी दरड कोसळून ३२ कुटुंबे दरडीखाली गाडली गेली. चार दिवस सुरू असलेले हे बचावकार्य सोमवारी नातेवाइकांच्या सांगण्यावरून थांबवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. या शोधकार्यादरम्यान ५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित ३१ जणांचे मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मृत घोषित केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. २२ जुलै रोजी दुर्घटना घडल्यानंतरही प्रशासन वेळेत न पोहाेचल्याने स्थानिकांनी ३२ मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर २३ जुलै रोजी एनडीआरएफ पथक दाखल झाल्यानंतर शोधकार्याला गती आली. या दुर्घटनेत तळिये गावातील ८४ ग्रामस्थ गाडले गेले. चार दिवस सुरू असलेल्या शोधकार्यात ५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून ३१ जण अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, एनडीआरएफ आणि टीडीआरएफ पथकाकडून शोधकार्य सुरू असताना अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे हाती लागत होते.

जेसीबीच्या मदतीनेही मातीचा मलबा काढत असताना मृतदेहाचे अवयव येत होते. अखेर नातेवाइकांनी आता शोध कार्य थांबवा, मृतदेहाची विटंबना नको, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार नातेवाईक, स्थानिक, आमदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन आज २६ जुलैपासून तळिये येथील शोधकार्य थांबवण्यात आले. तसेच मृत घोषित केलेल्यांच्या नातेवाइकांकडून जिल्हा प्रशासनाने हमीपत्र घेतले असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

सांगलीकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
तब्बल चार दिवसांनंतर सांगलीत महापूर ओस लागला आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत चार फुटांच्या पाणी पातळी कमी झाल्याने सांगलीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. महापुराच्या विळख्यात निम्मेअधिक सांगली शहर अडकले होते. अनेक नागरी भागात पाणी साचल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, सकाळपासून पुराचे पाणी उतरु लागले आहे. गणपती पेठ, स्टेशन रोड,आमराई परिसर,या भागातील पाणी बऱ्यापैकी ओसरले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत पाणी गतीने ओसरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दरम्यान, सांगलीत अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने येथील दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे दुकाने उघडण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.

सातारा : जिवाची बाजी लावून वीजपुरवठा पूर्ववत
सातारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज. अनेक ठिकाणी तारा तुटणे, पोल वाहून जाणे अशा घटना घडल्या आहेत. हे सर्व पूर्ववत करण्यासाठी जिवाची पर्वा न करता महावितरण विभागाचे कर्मचारी काम करत आहेत.

वेण्णा नदीला महापूर आल्यामुळे उच्चदाब वाहिनीचे बारा पोल वाहून गेले. त्यामुळे चौदा गावांचा (केळकर, डांगरेघर, पुनवाडी, धावली इ. ) वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाऊस आणि चिखलाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी खांद्यावरून पोल वाहून अंधारा

बातम्या आणखी आहेत...