आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रिक्षाचालकाच्या मुलीला 41 लाखांचे पॅकेज, कोल्हापूरच्या अमृता कारंडेची अ‍ॅडोब कंपनीत झाली निवड

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वसामान्य घरातील मुलीने यश मिळवल्याने होतोय कौतुकाचा वर्षाव

केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या संगणकशास्त्र विभागामध्ये (अंतिम वर्ष) शिकणाऱ्या अमृता विजयकुमार कारंडे या विद्यार्थिनीला जगप्रसिद्ध अ‍ॅडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड होऊन तब्बल ४१ लाखांचे पॅकेज मिळाले. त्याबद्दलचे पत्र अ‍ॅडोब कंपनीकडून तिला नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती केआयटीचे चेअरमन सुनील कुलकर्णी व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार यांनी दिली. अमृता ही सर्वसामान्य कुटुंबातून आहे, तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक असून आई राजश्री गृहिणी आहे. भविष्यामध्ये आपल्या देशाच्या आयटी व संगणकशास्त्र क्षेत्रामध्ये नवनिर्मितीचे योगदान देण्याचे अमृताचे स्वप्न आहे.

केआयटी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना अ‍ॅडोब कंपनीने ‘C कोडिंग’ स्पर्धा घेतली होती.या स्पर्धेद्वारे अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड केली होती. त्याकरिता तिला मासिक १ लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. कठाेर मेहनत घेऊन तिने हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल कोल्हापूर आणि परिसरातील अनेक संस्थांसह मान्यवरांनी अमृता हिचे कौतुक केले आहे.

कंपनीने दिली खास प्री-प्लेसमेंटची ऑफर
इंटर्नशिपदरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने दाखविलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून कंपनीने तिला ही खास प्री-प्लेसमेंटची ऑफर दिली. ही प्लेसमेंट देशपातळीवरील विशेष म्हणून गणली जाते. संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार, विभागप्रमुख डॉ. ममता कलस, प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार यांनी तिला मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...