आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी कोल्हापूरतल्या ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आज शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी लाक्षणिक उपोषण केले. राजघराण्यातील व्यक्ती अशी आंदोलनाला बसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
समरजितसिं घाटगे यांनी केलेल्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी वैयक्तिक राजकारणासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा वापर करू नये अशी टीका करण्यात आली. याला उत्तर देताना समरजितसिंह घाटगे यांनी राजकारण नव्हे महाराष्ट्राचा सेवक म्हणून उपोषण केल्याचे सांगितले. तसेच राजकारण म्हणणार्यांनी धाडस असेल तर थेट येवून बोलावे असेही ते म्हणाले.
फडणवीसांचा घाटगेंच्या आंदोलनाला पाठिंबा...
सरकारच्या मोघलाई विरोधात समरजितसिंह घाटगे यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे म्हणत फडणवीस यांनी आंदोलनाचे समर्थन केले. तसेच सरकारने याची तत्काळ दखल घेत आंदोलन संपवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.