आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुश्रीफ गटाला मोठा धक्का:मुश्रीफ गटाच्या नगराध्यक्षा समरजितसिंह गटात दाखल

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी गुरुवारी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचे भाजपमध्ये कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील निवासस्थानी स्वागत केले.

माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून निवडून आल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटाला रामराम ठोकत राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुश्रीफ गटातून माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, संतोष सोनुले यांनीही राजे गटात प्रवेश केला आहे. मतदार संघात राजे गटाचे वर्चस्व वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...