आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:अयोध्येतील रामाच्या मूर्तीला मिशी असावी : संभाजी भिडे, पवारांनी भूमिपूजनाला उपस्थित राहावे

सांगलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कोरोना संकट वाटणाऱ्यांनी रामनामाचा जप करावा'

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीला मिशी असावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानने मंदिराचे प्रमुख विश्‍वस्त गोविंदगिरी महाराजांकडे केली आहे, अशी माहिती संभाजी भिडे यांनी दिली.

राम हा अतुलनीय, अनुकरणीय व प्रेरणा देणारा पुरुष होता. त्यांच्या कार्यामुळे त्यांना दैवत्व प्राप्त झाले. त्यामुळे रामाच्या मूर्तीला मिशी असावी. आजपर्यंत देशातील विविध राम मंदिरात रामाच्या मूर्तीला मिशी दिसत नाही. आजपर्यंत देशातील चित्रकार आणि मूर्तिकार तसेच शिल्पकारांनी मूर्ती किंवा रामाची प्रतिमा निर्माण करताना मोठी चूक केली आहे. त्यामुळे ती तातडीने दुरुस्त करावी, असा आग्रह महाराजांसमोर धरला असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. कुरुक्षेत्रावरील अर्जुनाच्या मन:स्थितीप्रमाणे सध्या हिंदू समाजाची अवस्था झाली आहे. त्यामुळे कोरोना संकट वाटणाऱ्यांनी रामनामाचा जप करावा, असा सल्ला भिडे यांनी दिला.

पवारांनी भूमिपूजनाला उपस्थित राहावे
शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, दोघेही राममंदिर उभारणीबाबत गोंधळलेल्या मानसिकतेचे दर्शन घडवत आहेत. शरद पवार यांना या भूमिपूजनाचे निमंत्रण नसले तरीही त्यांनी हिंदू हिताचा विचार करून या कार्यक्रमाला उपस्थित राहाव. मुख्यमंत्र्यांनी न घाबरता राज्याचा दौरा करून जनतेला धीर द्यावा, असा सल्लाही भिडे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...