आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडे यांचे वादग्रस्‍त वक्तव्य /:लोकप्रतिनिधी हिंदवी स्वराज्यासाठी कलंक

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेतील आणि विधानसभेतील लोकप्रतिनिधी हिंदवी स्वराज्यासाठी कलंक आहेत. तसेच सर्वधर्मसमभाव हा विचार देशावर लादणारे ‘गांडूळ’ प्रवृत्तीचे आहेत, असे अाक्षेपार्ह वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी केले.

या वेळी त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत भाजपचा अपवाद वगळता अन्य राजकीय पक्ष नेत्यांवर कडाडून टीका केली.

शिवप्रतिष्ठानच्या वतीने गेले नऊ दिवस आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्या बुधवारी झालेल्या समारोप कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. या वेळी त्यांनी ‘सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे. हा सत्य विचार नाही. हा असत्याच्या मार्गाने जाणारा आहे. हा इतिहासाला मान्य नाही. या देशातील सर्व लोकप्रतिनिधी आपल्याला मातृभूमीसाठी जगणारे असणे गरजेचे आहे. परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून लोकप्रतिनिधीतील हा विचार लुप्त झाला आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.

खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांना जे मतदार निवडून पाठवतात, जनसेवेसाठी पाठवतात, ते मात्र सर्वजण पगार घेतात. हे भाडोत्री असून आपल्या लोकशाहीला व परंपरेला लागलेला तो कलंक आहे, अशा शब्दांत संभाजी भिडे यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली. संभाजी भिडे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात.

बातम्या आणखी आहेत...