आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजेंचा एल्गार:मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची आक्रमक भूमिका, 16 जूनला कोल्हापुरातून निघणार पहिला मराठा मोर्चा

कोल्हापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्ही बोललो, आता तुम्ही बोला', असे या आंदोलनाचे घोषवाक्य असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर मराठ समाज आक्रमक झाल्याचे दिसत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sयांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परीषद घेत याविषयी माहिती दिली. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मूक असणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले आहे.

'आम्ही बोललो, आता तुम्ही बोला', असे या आंदोलनाचे घोषवाक्य असणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदारांना बोलावून भूमिका मांडण्याची विनंती केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या मूक आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही तर त्यानंतर मुंबईत विराट 'लाँग मार्च' काढला जाईल आणि मुंबईतला मोर्चा सरकारला परवडणारा नसेल असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या संभाजी राजेंनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात समन्वयकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'मराठा समाजाने जी ताकद दाखवायची होती, ती दाखवली आहे. पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवून वेठीस धरणं योग्य होणार नाही. ज्या लोकप्रतनिधींना समाजाने निवडून दिले आहे, आता आरक्षणासाठी लढणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणं महत्त्वाचं आहे. आरक्षणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांची असल्याचे संभाजीराजे भोसले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...