आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजाला आवाहन:मराठा आरक्षण रद्द होणे समाजासाठी अतिशय दुर्दैवी, पण कोरोनाने माणसं मरत आहेत त्यामुळे उद्रेक होऊ नये; आंदोलकांना संभाजीराजेंचे आवाहन

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात माणसं मरत आहेत, समाजाने टोकाचे पाउल उचलू नये -संभाजीराजे

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने आधी दिलेल्या हायकोर्टाचा निकाल आणि मागास आयोगाचा रिपोर्ट पाहिला. त्यातून मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे नाही असे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आपल्याला मान्य करावा लागेल. परंतु, मराठा समाजाच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे.

कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ते कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेही न्यायलयात आरक्षण टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे, कुणालाही दोष देण्यात काही अर्थ नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित यावे. मराठा आरक्षण न्यायलयाने रद्द केले यावर काही मार्ग काढायला हवा. सोबतच, शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना विशेष अधिकाराने जास्तीत-जास्त जागा मिळवून द्याव्या, जागा वाढवाव्या, यासाठी राज्य सरकारला कोणत्याही परवानगीची गरज नाही.

आंदोलनांना केले संयम बाळगण्याचे आवाहन
खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यासोबतच मराठा समाजाला आणि आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोराना काळात परिस्थिती अतिशय भयंकर आहेत. कोरोना काळात माणसं मरत आहेत. अशात उद्रेक होऊ नये याची काळजी मराठा समाज आणि आंदोलकांनी घ्यायला हवी. सर्वात आधी आपली माणसं जिवंत असणे गरजेचे आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत मराठा समाजाने कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.

सुप्रीम कोर्टाने बुधवारी मराठा आरक्षणावर निकाल देताना आरक्षणच रद्द केले. यानुसार राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा देखील रद्द झाला आहे. न्यायलयाने गायकवाड समितीच्या शिफारसी सुद्धा नाकारल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...