आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे म्‍हणाले:गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेवर उपाययोजना करा

कोल्हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरातत्त्व विभागामार्फत किल्ले दत्तक योजना व तत्सम योजनांमधून केवळ पर्यटनाच्या दृष्टीने काम केले जायचे. मात्र मूळ ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था तशीच राहायची. यामुळे पर्यटनाबरोबरच प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन व जतन कार्यावर अधिक भर द्यावा. रायगड विकास प्राधिकरणाशी निगडीत दुर्गराज रायगडावरील उत्खनन, गडावरील लाइट व्यवस्था, अद्ययावत रोपवेसाठीची आवश्यक तरतूद करण्यात यावी, आदी विषयांवर छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती यांच्याशी चर्चा केली. त्यांना विविध मागण्यांचे दिल्लीमध्ये निवेदनही दिले.

संभाजीराजे म्हणाले की, ‘मी बैठकीत गडकिल्ल्यांच्या विकासासाठी मुद्दे मांडले. राज्यातील गडकोटांची होत असलेली दुरवस्था व काही अनुचित प्रकार होत आहेत, त्यावर त्वरित उपाययोजना करावी. राज्यातील पन्हाळगड, विजयदुर्ग अशा महत्त्वाच्या गडावर वारंवार तटबंदी कोसळणे, बुरुज ढासळणे असे प्रकार होत आहेत. यावर दूरगामी प्रभावी ठरणाऱ्या उपाययोजना करणे नितांत आवश्यक आहे.’ राज्यातील गडकोटांच्या देखभाल, जतन व संवर्धनासाठी पुरातत्त्व विभाग व फोर्ट फेडरेशनची मोलाची भूमिका आहे.

बातम्या आणखी आहेत...