आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजित पवारांनी कुठला संदर्भ घेऊन ही वाच्यता केली, हे त्यांनी सांगावे. माझी त्यांना सूचना आहे की, कुठलेही ऐतिहासिक विधान करतांना अभ्यास करूनच करावे. त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. ते अर्धसत्य आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराजरक्षक अन् धर्मवीरही होते, ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हे वक्तव्य केले. दरम्मयान, दुसरीकडे अजित पवारांविरोधात भाजपने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.
हे नाकारू शकत नाही
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्वराजरक्षक आहेत. हे निश्चित आहे. त्यांनी धर्माचे रक्षण केले हे कोणी नाकारू शकत नाही. मी वेळोवेळी ऐतिहासिक कार्यक्रम असेल तेव्हा माझ्या भाषणाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांचे नाव घेताना स्वराज्यरक्षक, धर्मवीर असे संबोधले आहे.
आत्मचिंतन करा
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती आहे की, इतिहासाच्या बाबतीत तुम्ही आत्ताच्या काळात राहताना जे काही विधान करता ते अत्यंत चुकीचे आहे. इतिहासकारांनी जे काही मांडलेले आहे त्याचे आपण आत्मचिंतन करावे.
असे वक्तव्य करणे टाळा
पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, पुढाऱ्यांनी आत्मचिंतन करून समाजाला दिशा देण्याचे काम करावे. विकृत वक्तव्य करणे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही. असे वक्तव्य करणे टाळा. समाजासाठी काय करता येईल ते पाहा. पुण्यात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारायचे आहे त्यासाठी किती निधी दिला ते बोला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.