आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकारण खालच्या पातळीवर पोहोचले आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेला काही देणघेणे नाही. व्यक्तीकेंद्रित राजकारण सुरु असून कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाही याकडेच सगळे लक्ष असल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आत्ता सगळेच एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. व्यक्तीकेंद्रित राजकारण सुरु असून कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाही याकडेच सगळे लक्ष असल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
विकासावर बोला
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, सध्या खुर्ची टिकवण्यासाटी आमदारांची धावपळ सुरु आहे. आज लागणाऱ्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेला काही देणघेणे नाहीये. सामान्य लोकांना अपेक्षा आहे की यांनी विकासावर बोलावे. मात्र हे सर्व आपल्या खुर्च्या टिकवण्यात व्यस्त आहेत, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.
16 आमदार अपात्र होणार?
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार का, शिंदे सरकार राहणार की जाणार, मुख्यमंत्री बदल होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची 16 आमदारांवर टांगती तलवार आहेत. त्यात स्वतः मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, रमेश बोरणारे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.
संबंधित वृत्त
सत्तांतर होणार का?:शिंदे सरकार राहणार की जाणार; थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, साऱ्या देशाचे लागले लक्ष
देशाच्या राजकारणाला दिशादर्शक ठरणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या निकालाचे वाचन करणार असून, तो जनतेला लाइव्ह याची देही याची डोळा पाहता येईल. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.