आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घाला:सांगलीमध्ये कार-ट्रॅव्हल्सची टक्कर, देवीच्या दर्शनाहून येताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघे ठार

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवीचे दर्शन घेऊन येत असताना कारचालकाला झोप लागल्याने खासगी ट्रॅव्हल्सवर आदळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात आज सकाळी विटा नेवरी रोडवर हा अपघात झाला. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कार ट्रॅव्हलची जाेरदार धडक

आज सकाळी 7 वाजता विट्याहून नेवरीकडे निघालेल्या कारचा गितांजली ट्रॅव्हल्सला धडकून अपघात झाला. या अपघातात एक महिला व तीन पुरुष जागीच ठार झाले आहेत. तर एकजण एअरबॅगमुळे बचावला.

चंद्रकांत काशीद, त्यांची पत्नी सुनीता काशीद आणि मेव्हणा अशोक अशी मृतांची नावे आहेत.

नक्की घडले काय?

खासगी ट्रॅव्हल विट्याहून साताऱ्याला जात होती. तर कार साताऱ्याहून विट्याच्या दिशेने येत होती. कार अत्यंत भरधाव वेगात होती. लक्ष्मीदेवीच्या दर्शनाहून मुंबईत परतत असताना कारचालकाला झोप लागली. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने ट्रॅव्हल्सला जोरात धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. हे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.