आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकशाही दिनानिमित्त तक्रार ऐकूण घेणारे महापालिका आयुक्त सुनील पवार यांना बूट फेकून मारल्याची घटना आज सांगलीमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. कैलास काळे असे बूट फेकणाऱ्या तक्रारदाराचे नाव आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याला सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. थेट आयुक्तांवर बूट फेकल्याने महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झालेत. त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
नेमके प्रकरण काय?
सांगली महापालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही दिनी आलेल्या तक्रारी महापालिका आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त ऐकूण घेत होते. यातल्या अनेक तक्रारींचे निवारण करणे सुरू होते. कैलास काळे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्राची तक्रार दिली होती. मात्र, आयुक्तांनी ही तक्रार मान्य करता येत नसल्याचे सांगितले. या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कैलास काळे यांचा संताप अनावर झाला.
पोलिसांच्या दिले ताब्यात
तक्रारदार कैलास काळे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात पायातला बूट काढून फेकून मारला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सारेच हबकले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत काळे यांना पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. या घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
नागरिकांचे हाल
तक्रारदार कैलास काळेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिकांचे हाल सुरू झालेत. हे आंदोलन मागे घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. महापालिका आयुक्तांनीही कामबंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.