आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुहागर मतदारसंघात ज्यावेळी रामदास कदम यांचा पराभव झाला त्याच्या आदल्या दिवशी रामदास कदम यांच्या जामगे गावातील कुत्री रडत होती, अशाप्रकारचे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. तसेच बोबड्या, दळभद्री असा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानात सभा झाली. त्यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्यापासून एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. त्यांच्या या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील याठिकाणी सभा झाली. तेव्हापासून कोकणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल चिपळूण येथे एता जाहिर कार्यक्रमात संजय कदम यांनी रामदास कदम यांनी निवडून येण्यासाठी काय काय केले होते, याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
तीन भगत आणले होते
संजय कदम म्हणाले, रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तीन भगत आणले होते. मात्र त्यावेळी ते 13 हजार मतांनी पराभूत झाले होते. वीर मतदान केंद्रावर रामदास कदम यांना गुहागर मतदार संघामध्ये ज्या वेळी निवडणूक झाली त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत केवळ 1 मत मिळाले होते. रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तीन भगत आणले होते असा गौप्यस्फोटही यावेळी संजय कदम यांनी केला.
पराभवाचे खापर फोडले
संजय कदम म्हणाले, गुहागर मतदार संघातून रामदास कदम पराभूत झाले, त्याचवेळी चिपळूण मतदार संघातून सदानंद चव्हाण शिवसेनेकडून विजयी झाले होते. विजयी झाल्यानंतर सदानंद चव्हाण मुंबईला रामदास कदम यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यावेळी रामदास कदम यांनी पराभवाचे खापर सदानंद चव्हाण यांच्यावरच फोडल्याचे कदम म्हणाले.
अडाणी रामदास कदम
यावेळी संजय कदम यांनी खालच्या पातळीवर टीका केली. ते म्हणाले, रामदास कदम यांची उंची साडेचार फूट, आणि त्यांच्या मुलाची उंची 6 फूट अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. चोऱ्या माऱ्या केलेले रामदास कदम, अडाणी रामदास कदम अशा शब्दांमध्ये त्यांनी रामदास कदम यांना डिवचले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.