आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभूराज पाटणचं पापाचं पित्तर चंबू:सजंय राऊत यांची शेलक्या शब्दांत टीका; म्हणाले - बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हातात

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शंभूराज देसाई म्हणजे पाटणच्या पापाचं पित्तर चंबू. त्यांना शिवसेनेमुळे मंत्रिपद मिळाले, अशी शेलकी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. चाळीस चोर ज्या पद्धतीने शिवसेनेशी बेईमानी करून पळून गेले. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्य बाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्या चोरांना मी चोर मंडळ म्हटले. त्यांनी शिवसेना पक्ष नव्हे तर शिवसेना विधिमंडळ पक्ष फोडला. अशा चोर मंडळामुळेच विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावली असल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये बोलत होते.

सांगली दौरा संपवून सातारला जाताना त्यांनी कराडमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. हक्कभंगाच्या नोटीसीबद्दल विचारले असता मी कुणाचा हक्कभंग केलाय, असा प्रतिप्रश्न करून खासदार राऊत म्हणाले की, विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याएवढा मी असभ्य माणूस आहे का? मी एका वृत्तपत्राचा संपादक आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त काळ मी संसदेत आहे. कोणते शब्द कोठे वापरायचे ते माहिती आहे. मराठी भाषा मला त्यांच्यापेक्षा जास्त समजते. हे चाळीस चोर शिवसेनेशी बेईमानी करून पळून गेले. असे म्हणत राऊतांनी टीका केली.

काय म्हणाले राऊत?

खासदार राऊत म्हणाले, पळून गेलेल्या चोरांनी विधिमंडळ पक्ष फोडला, पक्ष नाही. त्यांनी पैशाच्या जोरावर शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केला. अशा चोरमंडळामुळेच विधिमंडळाची प्रतिष्ठा खालावली, असे माझे म्हणणे असल्याचा खुलासा त्यांनी केला. सांगलीत शिवराळ भाषा वापरल्या विषयी विचारले असता मराठीत त्याला शिवी म्हणत नाहीत. मी वापरलेल्या शब्दाचा डिक्शनरीत काय अर्थ आहे तो समजून घ्या. मराठी भाषेत शिव्या आपण प्रेमाने वापरतो. शिवराळ भाषा आणि शब्दांमुळे संस्कृतीला तडा जात नाही का, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना लफंगेगिरी करून चोरांच्या हातात ठेवली. हे लोकशाही आणि भारतीय संस्कृतीला धरून आहे का? याचा आपण सगळ्यांनी जरा विचार केला पाहिजे.

काेण हे गृहस्थ?

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला तुमच्या आणि आदित्य ठाकरेंच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय व्यक्त अमेय खोपकरांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात बोलताना खासदार राऊत यांनी कोणावर हल्ला झालाय? संदीप देशपांडे कोण? मला समजले नाही. कोण आहेत हे ग्रहस्थ? असे उपरोधक सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडलेली आहे की रोज पाच-पंचवीस लोकांवर हल्ले होताहेत. रोज शंभरेक लोकांना धमक्या दिल्या जाताहेत. हे ग्रहस्थ कोण, ते मला माहिती नाही, असेही राऊत म्हणाले. आमदार नीतेश राणे करत असलेल्या टीकेबद्दल बोलताना खासदार राऊत म्हणाले, त्यांना टीका करू द्या. त्यांचा मेंदू टिल्ला. त्याचं सगळंच टिल्लं असल्याचा खोचक टोलाही खासदार राऊत यांनी नीतेश राणेंना लगावला.

अनेक घाव झेलले

साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कलामंदिरात झालेल्या मेळाव्यात संजय राऊत यांनी शंभूराज देसाईंवर सडकून टीका केली. यावेळी शभूराज देसाईंना 'कोण ते पाटणचं पापाचं पित्तर चंबू आहे. त्यांना शिवसेनेमुळे मंत्रिपद मिळाले. राऊत पुढे म्हणाले की, "मला माफी मागण्याची सवय नाही, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. शिवसेना संपली म्हणतात तीच शिवसेना आज आम्ही रस्त्यावर पहात आहोत. आता ही शिवसेना धगधगत्या मशालीचे अग्निकुंड झाले आहे. सध्या शिवसेनेची अवस्था अजिंक्यतारा किल्ल्यासारखी झाली आहे. या किल्ल्यात छातीवर आणि पाठीवर अनेक घाव झेलले आहेत. आता शिवसेना गद्दारीचे घाव झेलत आहे. तरीही आमची शिवसेना टिकून आहे. पण कितीही काही झाले तरी शिवसेनेची बस कधीही रिकामी राहिली नाही. कायम हाऊसफुल राहिली."

बातम्या आणखी आहेत...