आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हानांवर आव्हान:चंद्रकांत पाटलांना गाव राखता आले नाही अन् आव्हान देताय? कोल्हापूर महापालिका लढवून दाखवाच; भाजप प्रदेशाध्यक्षांना हसन मुश्रीफांसह संजय राऊतांचे उत्तर

मुंबई / कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांना आपले गाव राखता आले नाही. त्यात ते संजय राउत यांना आव्हाने देत असल्याची खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणूक सेफ जागेवरूनन लढवून दाखवावी असे आव्हान पाटलांनी दिले होते. त्यावर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला चढवला. अशाच स्वरुपाची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी देखील दिली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संजय राउत यांना आव्हान देतानाच चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवरही बोलतात हे आक्षेपार्ह आहे. चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. तरीही शरद पवारांना माढातून माघे घालवल्याचे आणि संजय राऊत यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान देतात. चंद्रकांत पाटील यांना आपले गाव सुद्धा राखता आले नाही.

राज ठाकरेंवर राज्यातील तरुण वर्ग नाराज

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीने भाजप मनसेच्या आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या भेटीवर बोलताना, राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग नाराज झाले आहे असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, आम्ही काही बोललो का?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. राउत म्हणाले, "तुम्ही विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात. त्यावेळी आम्ही काही बोललो का? आम्ही आमचे पाहून घेऊ, आधी तुम्ही तुमचे बघा." असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी भाष्य केले होते. मनसे आणि भाजपने युती करून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान राउतांनी दिले होते. त्याच आव्हानाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राउत यांच्यावर टीका केली होती. मुंबईत शिवसेनेची खरच ताकद असेल तर संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीत सेफ जागेवरून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...