आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले:दागिने घेऊन जाणाऱ्या मुंबईच्या सराफास म्हसवड परिसरात दुचाकीस्वारांनी लुटले

सातारा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील सोने-चांदीचे व्यापारी अकलूज येथे त्यांच्या कारने म्हसवड-माळशिरस रोडवरून जात असताना गाडेकर वस्तीजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. त्यांच्याकडील जवळपास २० लाख रुपये किमतीचे सोने लुटून त्यांनी पोबारा केला. मुंबई येथील कुमावत नावाचे सोने-चांदीचे व्यापारी आपल्या कारमधून अकलूज येथे निघाले होते. तेथे त्यांची सोन्याची पेढी आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गाडेकर वस्तीजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी कारसमोर दुचाकी आडव्या घातल्या. कार थांबवली असता एकाने त्याच्याजवळील पिस्तूल काढले. दमदाटी करून कुमावत यांच्याजवळील १५ ते २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...