आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार VIDEO:वाई तालुक्यातल्या सुरूरमधली घटना; मांत्रिकावर कारवाईची 'अंनिस'ची मागणी

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाई तालुक्यातील सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार उघसकीस आला आहे. मांत्रिकावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे .

सुरूर (ता. वाई) येथे धावजी पाटील मंदिर आहे. मांढरदेव येथील काळुबाई मंदिरात दर्शन घेऊन धावजी पाटील येथे दर्शन घेण्याची प्रथा भाविकांमध्ये आहे. मांढरदेव प्रमाणेच येथेही मांत्रिक तांत्रिकांकडून भाविकांवर अघोरी प्रकार केले जातात. एका इसमावर अघोरी प्रकार करून मांत्रिकाकडून भूत उतरविले जात होते. यासाठी संबंधित इसमाला मारहाण व शिवीगाळ केली जात होती. हा प्रकार समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधित मांत्रिकावर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी केली आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत. लोकांची फसवणूक सुरू आहे. अशा मांत्रिक , तांत्रिकांवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...