आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:कराड जवळील तांबवे पुलानजीकच्या नदीपात्रात सापडले बॉम्ब!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये ग्रॅनाईट (बॉम्ब) सापडले. कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. याला पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही बाब समोर आली. कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथून जवळच असलेल्या तांबवे पुलानजीक नदीपात्रामध्ये सोमवारी सकाळी काही युवक मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी त्या युवकांनी नदीच्या पाण्यामध्ये गळ (जाळी) टाकल्यानंतर त्यांच्या गळाला मासा लागला असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी तो गळ नदीच्या पात्रातून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी त्यामध्ये ग्रॅनाईट (बॉम्बे) असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते अतिशय अवजड असल्याने त्यांना त्याबाबत शंका आली. मासेमारी करणाऱ्या युवकांनी याबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधला.

बातम्या आणखी आहेत...