आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान:भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, अन्यथा कडेलाेट टोकावरून उडी मारा

सातारा / प्रतिनिधी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका निवडणुकीवरून साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी पुन्हा त्यांचे बंधू आ. शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान दिले की, 'माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंटवरून मी उडी मारेन. आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी'

सातारा नगर पालिकेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीसमाेर सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खा. उदयनराजे भाेसले आले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह त्यांच्या नगरविकास आघाडीवर हल्लाबाेल केला.

निवडणुकीचे रणशिंग

खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत हिम्मत असेल तर मी बोललेल्या गोष्टींना उत्तर द्या, असे आवाहन शिवेंद्रराजेंना दिले.

माझी सुरूवात नगरसेवकापासून

उदयनराजे भोसले म्हणाले, फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं. यावेळी ५० च्या ५० नगरसेवक सातारा विकास आघाडीचे निवडून येतील. माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली. तुमच्या सारखा मी आल्हाद आमदार झालेलो नसल्याची खोचक टीकादेखील उदयनराजे यांनी केली. विशेष म्हणजे खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही भारतीय जनता पक्षात आहेत.

बातम्या आणखी आहेत...