आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या डोक्यात संशयाचे भूत:पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून, जीव घेतल्यानंतर आरोपी पती ठाण्यात, पोलिसांपुढे कबुली

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना सातारा येथील मतकर कॉलनी येथे दि. ८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पती दिलीप वामन पवार, (वय ६२, रा. मतकर कॉलनी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर राहून आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिलीप वामन पवार यांनी दि. ८ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पत्नी सौ. रंजना दिलीप पवार, (वय ६०, रा. मतकर कॉलनी, सातारा) यांच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन डोक्यात दगडी पाटा मारला. या घटनेत सौ. रंजना पवार या गंभीर जखमी झाल्या.

त्यांना तात्काळ उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दि. ८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा प्रदीप दिलीप पवार, (वय २४) याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली.

दरम्यान खून करणारा पती दिलीप वामन पवार याने स्वतः शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर होत आपण केलेल्या कृत्याची कबूल केली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खून प्रकरणी दिलीप वामन पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. या घटनेमुळे मतकर कॉलनी परिसरात एकच खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...