आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सातारा दौरा:कंटेनमेंट झोनचा कालावधी 14 दिवस करण्याचा विचार, कर्ज काढू पण पगार थांबवणार नाही -विजय वडेट्टीवारांचा दावा

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उदयनराजेंच्या घरी भेळ खायला गेलो होतो, भेटीनंतर वडेट्टीवारांचे गमतीशीर उत्तर

जिल्ह्यातील जिल्ह्यातील कोरोना संकट, अवकाळी पाऊस आणि मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातारा दौरा केला. यावेळी सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील कंटेनमेंट झोनचा कालावधी कमी करण्याचा सुद्धा सरकार विचार करत आहे. सध्या एखाद्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर त्यात 28 दिवसांचे निर्बंध लादले जातात. हा कालावधी कमी करून 14 दिवस करण्याचा सरकारचा विचार आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातच राज्य सरकारने केंद्राला अशा स्वरुपाचा प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान, पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत बोलताना, पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आवश्यकता पडल्यास कर्ज काढला जाईल. परंतु, त्यांचा पगार थांबणार नाही. माझ्या यापूर्वीच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे.

दरम्यान, सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 10, जावळी तालुक्यातील 3, सातारा तालुक्यातील दोन गावांमध्ये भूस्खलनाचा धोका आहे, यासाठी साडे आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गतवर्षी पावसाळ्यात कराड, पाटणसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर होता. यात गेल्या काही वर्षांत शिल्लक असणाऱ्या 14 कोटींच्या निधीची तरतूद लवकरच करणार आहे. यासोबतच, यावर्षी 15 जुलैपर्यंत 25 जणांची एनडीआरएफ टीम जिल्ह्यात तैनात करणार असल्याचे ते पुढे म्हणाले. यासह कोल्हापूरात 3, सांगलीत 2, अशा एनडीआरएफच्या टीम कार्यारत केल्या जातील. तसेच 8 नवीन बोटी खरेदीसाठी दीड कोटींचा निधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंजूर केला जाणार आहे.

उदयनराजेंनी सोशल मीडियावर शेअर केले होते भेटीचे फोटो

उदयनराजेंकडे भेळ खायला गेलो होतो

सातारा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याचे काही फोटो उदयनराजेंनी शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. त्याबद्दल विचारण्यात आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना, आपण केवळ भेळ आणि चहापानासाठी उदयनराजेंच्या घरी गेलो होतो असे उत्तर वडेट्टीवार यांनी दिले.

0