आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरलेल्या अजिंक्य पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व १८ जागा जिंकून खासदार उदयनराजे भोसले यांना जोरदार धक्का दिला. आज हा निकाल हाती आला.
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल ४० वर्षांनी ऐतिहासिक सत्तांतर झाले. येथे पालकमंत्री शंभूराज देसाई गटाने जिंकल्या १५ जागा जिंकल्या, तर पाटणकर गटाला ३ जागांवर समाधान मानावे लागले. खंडाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलने सर्व 11 जागांवर 23 ते 56 मतांनी विजय मिळवला.
अशी झाली निवडणूक
सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी सरासरी ९३ टक्के मतदान झाले होते. कराड बाजार समितीसाठी सर्वाधिक ९७ टक्के मतदान झाले होते. सातारा ( ९४%), कराड (९७%), पाटण (९३%), कोरेगाव (९५%), वडूज (९०%), फलटण (९२%), लोणंद (९५%) आणि वाई (९१%) मतदान झाले होते. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे विरुद्ध खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला. मात्र, येथे शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाने उदयनराजे यांच्या गटाला छोबीपछाड देत धूळ चारली.
उदयनराजेंना हद्दपार करू...
विजयानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, बाजार समितीतून जसे उदयनराजेंना हद्दपार केले, तसेच नगपालिकेतूनही करू. फक्त पदे भोगली. लोकांची कामे केली नाहीत. त्यामुळेच त्यांना मतदारांनी नाकारले. उदयनराजेंना मार्केट कमिटीची जागा हडपायची होती. मात्र, तो डाव आम्ही हाणून पाडला. त्यांना नगरपालिका निवडणुकीतूनही हद्दपार करू. उदयनराजेंचा भ्रष्ट कारभार लोकांनी पाहिला. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ताकदही कळाली. आता या निवडणुकीनंतर त्यांना खासदारकी द्यायची की नाही, या संदर्भात भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील, असा टोलाही त्यांनी हाणला.
शिवेंद्रसिंहराजे गट - सोसायटी गट
- रमेश चव्हाण- १२५६
- विक्रम पवार-१२७८
- भिकू भोसले - १२६२
- धनाजी जाधव - १२२४
- मधुकर पवार - १३०४
- राजेंद्र नलवडे - १२५४
- विजय पोतेकर - १२८९
- वंदना कणसे - १३३८
- आशा गायकवाड - १४०४
- दत्तात्रय कोकरे - १३१४
- इसूफ पटेल - १२९७
उदयनराजे (पुरस्कृत) शेतकरी संघटना गट
- दत्तात्रय जाधव - ३११
- सुदाम जाधव - ३०७
- राहुल ढाणे - ३०५
- संजय नलवडे - ३०२
- दत्तात्रय मोरे - ३१७
- उत्तम शिर्के - २८६
- अर्जुन साळुंखे - २८६
- शोभा भोसले - ३३३
- रत्नमाला जाधव - ३५१
- नारायण शेंडगे - ३७२
- राजकुमार ठेंगे - ३८४
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.