आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांची विकृती आता ऐवढ्यावर पोहोचली की त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत असतात. ज्या घराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा, या शब्दांमध्ये उद्यनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
उद्यनराजे भोसले म्हणाले, राजकारणात प्रत्येकाने मोजून मापून समजून बोलले पाहिजे. मी त्यांना जास्त ओळखत नाही आणि महत्त्वही देत नाही. त्यांचे सगळं राजकारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा भोवती फिरत आहे, तरीही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याबद्दल बोलत असतात. असे बोललेल्याने त्यांना तात्पुरते महत्व मिळते दूरपर्यंत मिळत नाही. आम्ही कधी सोयीचे राजकारण करत नाही.
निर्लज्जपणाची हद्द
उद्यनराजे पुढे म्हणाले, विधान करताना जपून करावे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, याची मांडणी शिवाजी महाराजांनी तेव्हा केली. राऊत यांची विकृती ऐवढ्यावर पोहोचली की त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळत असतात. निर्लज्जपणाची हद्द आहे. मी आजपर्यंत समाजकारणच केले.
वैचारिक पातळी खालावली
उद्यनराजे म्हणाले, लोकशाही नको असेल तर राजेशाही आणा. त्यांना काय बोलायचे ते बोलले. काही नसले बोलायला की राजघराण्यावर बोलायचे. ज्या घराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा. छत्रपतींचा आदर अनादर करण्याचा कोणाचा घास नाही. त्यांची वैचारिक पातळी खालावली आहे, अशा भाषेत उद्यनराजेंनी राऊत यांना सुनावले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिवगर्जना मेळाव्यात बोलताना केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.