आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारकरांना हादरवणारी आणि पेन्शनर सिटी या लौकिकाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना शहरात घडली आहे. एका महिलेने शेजार्याच्या 13 वर्षांच्या मुलीची ओळखीच्या इसमाला साडेतीन हजारांत विक्री केली.
नराधमाने या मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, ता. सातारा) आणि अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल झाला असून, दोघेही फरारी आहेत.
शेजारणीने विकले
बाहेरचे लोक येणार असून त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे, असे सांगून भारती कट्टीमणी या महिलेने त्या मुलीला सातार्यातील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी 40 वर्षांच्या अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार ठरवून त्याच्याकडून साडेतीन हजार रुपये घेऊन मुलीला त्याच्या ताब्यात दिले. त्यानंतर ती तेथून निघून गेली. त्या इसमाने शाळकरी मुलीवर लॉजच्या खोलीमध्ये बलात्कार केला. मुलगी रडू लागल्यानंतर तिला दमदाटी करण्यात आली.
मुलीचा आईला मेसेज
पीडित मुलीची आई बाहेरगावी होती. त्यामुळे मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मेसेज करून आईला कळविली. मेसेज पाहिल्यानंतर आईने मुलीला तत्काळ फोन केला असताा मुलगी रडायला लागली. तिने घृणास्पद प्रकाराची माहिती आईला सांगितली. घटना ऐकून आई देखील हादरून गेली. तातडीने तिने सातारा गाठला आणि मुलीच्या वडिलांना माहिती दिली.
पोलिसांत घेतली धाव
पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करून जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार कलमांन्वये गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक वाघमोडे हे या घटनेचा तपास करत आहेत.
चेहरा सीसीटीव्हीत कैद
या घृणास्पद घटनेची सातारा पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके विविध ठिकाणी रवाना केली. ज्या लॉजमध्ये संशयिताने मुलीवर बलात्कार केला, त्या लॉजमधील सीसीटीव्हीमध्ये नराधमाचा चेहरा कैद झाला आहे. दोन्ही संशयित सातारा शहरातून पसार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांची दोन्ही पथके कसून त्याचा तपास करत आहेत.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.