आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदनीय:‘नासा’तील प्रोजेक्टसाठी साक्षी पाटीलची निवड

सातारा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावची कन्या साक्षी चंद्रकांत पाटील यांची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्या भारतातील एकमेव उमेदवार आहेत. साक्षी पाटील यांनी मुंबईतील गोरेगाव येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भोपाळ येथील एरोनॉटिक इंजनिअरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. तेथूनच त्यांची नासामध्ये प्रोजेक्टसाठी निवड झाली.

जगातील फक्त १० जणांची या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली आहे. त्यात साक्षी पाटील या भारतातील एकमेव उमेदवार आहेत. साक्षी पाटील या स्वातंत्र्य सैनिक स्मृतिशेष आनंदराव पाटील यांच्या नात आहेत. आनंदराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावासाठी वाहून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...