आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विरोधकांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करतात ; ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

कोल्हापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. एक त्यांचा स्वभाव दिसायला मृदू , लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ. दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता व संपत्तीतील आपला कोणीही विरोधक मग साधा टिका करणारा असो. त्याचा काटा काढायचा व त्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करण्याचा असा आहे, असा गंभीर आरोप ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्राला उलटटपाली उत्तर मुश्रीफ यांनी दिले आहे.

मी केलेली मदत जाहीर केली तर तुम्ही माझ्या मागे पुन्हा ईडी व इन्कमटॅक्स लावाल...

पत्रात मुश्रीफ यांनी म्हटले की, चंद्रकांतदादांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त आहे, असे वाटते. दादा, गेल्या पाचवर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन - तीन लाख लोकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री मला आहे. मी व माझ्या फौंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर आपण पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावाल. त्यामुळे मी जाहीर करत नाही.

फक्त मला संपवण्यासाठीच तुम्ही केडीसीवर कारवाईसाठी अधिकार्यांवर दबाव आणला...

मी काय तुमचा शत्रू नव्हतो. जरूर वैचारिक विरोधक होतो. परंतु; मला संपवण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम ८८ कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणला, एमएससी बँकेवर ८८ ची कारवाई सुरु केली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केलात. फक्त मला संपवण्यासाठी, असा आरोपही मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर केला आहे.