आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:मुंबई, पुणेच्या धर्तीवर कोल्हापुरातही जम्बो कोविड सेंटर उभारा -खासदार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

मुंबई-ठाणे, पुणे च्या धर्तीवर कोल्हापुरातही जम्बो कोविड सेंटर लवकरात लवकर उभे करावे. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्ह्याला तात्काळ जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावेसुध्दा एक निवेदन त्यांच्या तर्फे पाठवून दिले. खास बाब म्हणून राज्य आपत्कालीन निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आवश्यक निधी देण्यात यावा अशी आग्रही मागणी खा.संभाजीराजे यांनी केली.

याप्रसंगी खा.संभाजीराजे छत्रपती यांनी एक महत्वाची विनंती केली की कोल्हापूरातील खासगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत सामील करण्यात यावे. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला कोरोनाचे गुणवत्तापूर्ण उपचार घेता येतील.

याप्रसंगी मंत्री महोदयांनी राज्य शासन योग्य ती पावले लवकरात लवकर उचलेल असे सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोल्हापूर येथील परिस्थितीचे गांभिर्य त्यांच्यापर्यंत पोहचवतो असा शब्दही त्यांनी दिला. तसेच त्यांच्या नगरविकास मंत्रालयाकडून जे जे शक्य, त्याची तात्काळ पूर्तता करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील रुग्णांकरीता अत्याधुनिक जम्बो कोविड केंद्र उभारण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा कोविड केंद्र उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी आश्वासन दिले.