आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्याला खालचे वरचे कळत नाही, त्याला काँग्रेसने कारभारकी दिली आहे. नाना पटोले हे राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व असून, दुर्दैवाने ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत, अशी बोचरी टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. ते सांगोला येथे बोलत होते.
सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार शहाजीबापू पाटील एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी शहाजीबापूंनी शरद पवारांवर स्तुतिसुमने उधळली. मात्र, माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले बापू?
शहाजीबापू म्हणाले की, सध्या अडचण अशी आहे. आपल्या माणदेशी भाषेत एक म्हण आहे. ज्याला खालतं वरतं कळत नाही, त्याला कारभारकी. त्या नाना पटोलेले कोळं कुठं, करगनी कुठं, नाराळ कुठं, अकलूज कुठं काय माहित हाय का? काँग्रेसमध्ये अध्यक्षपद द्यायला कोणी माणूस नाही, म्हणून याला काढलाय. राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व दुर्दैवाने सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
पटोलेंची टीका झोंबली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही टीका शहाजीबापूंना झोंबली. त्याचाच वचपा त्यांनी प्रत्युत्तर देऊन काढला. नाना पटोले यांनी शहाजीबापूंच्या काय झाडी, काय डोंगर...या विधानांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर शरसंधान साधले होते. तसेच तुम्हाला काय झाडी, काय डोंगरवाला आमदार आणि असे राज्य सरकार पाहिजे की आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सारखा इमानदार माणूस हवा असा केला होता. तसेच यावेळी त्यांनी शहाजी बापूंची नक्कलही केली होती.
संबंधित वृत्तः
दिव्य मराठी विशेष मुलाखत:लोकसभा, विधानसभेत भाजपच्या जागा घटणार, म्हणून फोडाफोडीचा खेळ : नाना पटोले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.