आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:तिरुपती देवस्थान कडून महालक्ष्मीला शालू भेट; देवीची काशिविश्वेश्वराला दर्शन रुपात पूजा

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने मातृत्व भावनेने आज करवीर निवासिनी महालक्ष्मी/ अंबाबाईला शालू अर्पण करण्यात आला. या भरजरी शालूची किंमत एक लाख चार हजार इतकी आहे. देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी शालूचा स्विकार केला.

तिरुपती देवस्थानचे ट्रस्टी भास्कर रेड्डी, लक्ष्मी रेड्डी, प्रशांती रेड्डी, स्वर्णलता रेड्डी, सुषमा रेड्डी, अपर्णा रेड्डी, जया रेड्डी यांनी हा शालू आधी अंबाबाईला अर्पण केला त्यानंतर तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केला. यावेळी समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, धनाजी जाधव उपस्थित होते.

देवीची काशिविश्वेश्वराला दर्शन रुपात पूजा

आज अश्विन शुद्ध षष्ठी . शारदीय नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईची अलंकार पूजा साकारली आहे ती भगवान शंकर काशी सोडून करवीरात निवासाला आले तो प्रसंग सांगणारी . विश्वाच्या निर्मिती नंतर भगवान विष्णूंनी दोन क्षेत्रांची निर्मिती केली एक उत्तरेला काशी दुसरं दक्षिणेला करवीर. उत्तरेची काशी ही मुक्तीदायक ज्ञानपीठ तिचं स्वामित्व भगवान विश्वेश्वराचं तर दक्षिणेचं करवीर म्हणजे मुक्ती बरोबरच भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देणारं महामातृक अर्थात आईचं मोठं शक्तीपीठ. जेव्हा विष्णूंनी या दोन क्षेत्रांची तुलना केली तेव्हा मुक्तीबरोबर भुक्ती देणारं हे क्षेत्र केवळ एका जवाच्या वजनानं श्रेष्ठ ठरलं म्हणून ही जवा आगळी काशी हा महिमा जाणून भगवान विश्वेश्वर आपल्या सर्व परिवारासह करवीरात आले त्यांनी जगदंबेचं दर्शन घेतले आणि त्या प्रसंगी मातेने त्यांना सांगितले की आपण माझ्या उजव्या बाजूला राहून सर्व भक्तांना तारक मंत्र द्या. त्याप्रमाणे आजही भगवान विश्वेश्वर माता अन्नपूर्णा धुंडीराज गणपती आणि काशी कुंडातील गंगेसह घाटी दरवाजा जवळ असलेल्या मंदिरात राहून भक्तांना मुक्ती देतात.