आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा कोरोना आढावा:शरद पवार आणि राजेश टोपे आज कराड दौऱ्यावर, कोरोना आढावा बैठकीत उदयनराजे भोसलेंची अनुपस्थिती

साताराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांच्या दौऱ्यांचा झंझावात सुरूच आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज सातारा येथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कराड येथे गेले आहेत. येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला राज्यसभा खासदार उदयनराजे अनुपस्थित आहेत. यापूर्वी त्यांनी बैठकीला बोलावत नाहीत, म्हणून नाराजी व्यक्त केली होती.

शरद पवारांच्या उपस्थितीत कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई , कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री (शहर ) सतेज पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील हे उपस्थित आहेत. मात्र याच काळात उदयनराजे भोसलेंनी या बैठकीत अनुपस्थिती दर्शवली आहे.

यापूर्वीही अनुपस्थित होते उदयनराजे

उदयनराजे भोसले हे साताऱ्यातील मोठे प्रस्थ आहेत. ते सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीलाही उदयनराजेंनी उपस्थिती दर्शवली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची त्यांची शरद पवार यांच्यासोबत ही पहिलीच बैठक ठरली असती. मात्र त्यांनी याही बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे.

पृथ्वीराज चव्हान हजर नसल्याने चर्चांना उधाण

कराड हे पृथ्वीराज चव्हाण यांचे होमग्राऊंड आहे. येथे आज शरद पवार आज दाखल झालेले आहेत. मात्र या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण गैरहजर राहिले. पृथ्वीराज चव्हाण हे मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नसल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वादामुळे चव्हाण या बैठकीला हजर नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...