आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे, तो आदेश एकनाथ शिंदे यांना मानावा लागतो. म्हणून ते कर्नाटकात प्रचार करत आहेत. याशिवाय आम्ही काय केले हे राऊतांना माहिती नाही, त्यांच्या बोलण्याकडे मी फारसे लक्ष देत नाही, अशी चौफेर फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही टोला हाणला. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे, हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारले तर ते खासगीत सांगतो असे म्हणतील, असे पवार म्हणाले.
अनेकांना संधी दिली
राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना कँबिनेट मंत्री म्हणून संधी दिली, पण आम्ही काय केले हे त्यांना माहिती नाही, आम्ही घरातील प्रश्नाची बाहेर जाऊन प्रसिद्धी करत नाही, असा टोला शरद पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
लिखाणाकडे दुर्लक्ष करतो
1999 याली राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला. त्यावेळी मी ज्यांना कॅबिनेट मंत्री पदवार संधी दिली त्या आमदारांना या आधी कधीच सत्तेतपद मिळवले नव्हते. मी स्वत: राज्यमंत्रीपदापासून राजकारणात सुरूवात केली आहे. पण मी अनेकांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्री केले. तुम्ही लिहले यांचे आमच्या मते काही महत्त्व नाही. राज्यात सत्तेत आलो, तेव्हा नव्या मंत्रिमंडळात सहभागी केले त्यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री केले होते. आम्ही तयार करतो की नाही ही कुणी लिहले हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, त्यांचा लिहण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, असे म्हणत शरद पवारांनी सामना अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले आहे.
कर्नाटकात मित्रपक्षाशी बोलणी नाही
शरद पवार म्हणाले की, कर्नाटकात आम्ही जे उमेदवार दिले त्यात आम्ही सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात विस्तारित पाऊल टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. काँग्रेस किंवा मित्रपक्षासोबत आम्ही कर्नाटकात बोललो नाही. कारण आम्हाला शुन्यपासून सुरूवात करायची होती, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे.
फडणवीस काही बोलू शकतात
फडणवीस काही बोलू शकतात. ते शब्दाचे खेळ करत असतात. शरद पवार म्हणाले की, रयतची घटना बदललली हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप त्यांनी खोडून काढला आहे. मी कोणतीही घटना बदललेली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या पक्षात काय स्थान आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या नेत्याला जर विचारले तर ते तुम्हाला खासगीत सांगतील असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी लोक पाहणी करण्यासाठी कुणीच पोहचले नाही, तर काही ठिकाणी पंचनामे झाले असले तरी शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. पक्ष सोडून शेतकऱ्यांना मदत करायला हवी असेही शरद पवारांनी म्हटले आहे. या सरकारची लोकांना मदत करण्याची भूमिका नाही, जनतेसमोर जाण्याची भूमिका सरकारची नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी प्रश्न सोडवावे
महाराष्ट्रात कुणीही यावे, पण केंद सरकारच्या मंत्र्यांने राज्यातील प्रश्नावर चर्चा करायला हवी, समस्या सोडवायली हवी असे शरद पवारांनी म्हटले आहे. तर कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा परत घेतला असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तर आम्ही काय केले हे त्यांना माहिती नाही, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखावर मत व्यक्त केले आहे.
भाजपमध्ये आदेशाची पद्धत
शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद भाजपच्या लोकांमुळे मिळाले आहे. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे, त्यामुळे भाजपचा आदेश शिंदेंना मान्य करावा लागतो म्हणून ते कर्नाटकात प्रचार करत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पक्ष बळकटीने काम करत आहे.
संबंधित वृत्त वाचा
कान टोचले : शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारले; राजीनामा घरातला पक्ष, त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो असा उल्लेख
संजय राऊत यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय केले, त्यांना माहिती नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांना फटकारले. पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.