आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान टोचले:शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारले; राजीनामा घरातला पक्ष, त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो असा उल्लेख

सातारा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय केले, त्यांना माहिती नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांना फटकारले. पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले की, आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहिती नाही, हा आमच्या घरातील प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना संधी देऊन मंत्री केले आहे. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही, तसेच कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही दुर्लक्ष करतो, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांना फटकारले.

आमचा घरचा प्रश्न

शरद पवार म्हणाले की, अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे. 1999 साली सत्तेत गेले तेव्हा आम्ही अनके सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. आम्ही काय केले त्यांना माहित नाही. महाविकास आघाडी वर काही परिणाम होणार नाही. आमच्यात काही गैरसमज नाही.

पवारांनी दिली यादी

शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा थेट हल्ला प्रथमच सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला होता. शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याचे म्हटले होते. यावर बोलताना 1999 मध्ये मत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, देशमुख, असे अनेक जणांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. या सर्वांना पहिल्यांदाच कॅबिनट मंत्रीपदाची संधी दिली होती, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.